विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. कोविड नियमांची अंमलबजावणी, आरोग्य सुविधा सज्जतेचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर निर्बंध कठोर करताना लॉकडाऊनबाबत विचार होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित रुग्ण वाढत आहेत. दुसऱ्या लाटेतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही महत्वाची बैठक होत आहे.Omicron Alert : PM Modi to hold Covid-19 review meeting Today
देशातली ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या 200 पार गेली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक ओमायक्रॉनग्रस्त आढळले आहेत. पंतप्रधान मोदींनी हे गांभीर्याने घेतलं असून आज पंतप्रधान मोदी आज या संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.
ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडू शकतो आणि त्यादृष्टीने प्राणवायूचा पुरवठा, औषधोपचार या सुविधांची किती तयारी करावी लागेल. या दोन्ही मुद्दय़ावर चर्चा होणार आहे. दुसऱ्या लाटेतल्या संकटाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदी यांनी ही आढावा बैठक बोलावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App