Tv Actor viraf patel gets married to saloni khanna : सेलिब्रिटीचं लग्न म्हटलं की, आलिशान मॅरेज हॉल अन् व्हीआयपी लोकांची उच्च बडदास्त ठेवली जाते. लग्नासाठी कुणी इटली गाठतं, तर कुणी पॅरिस! पण असेही काही जण आहेत जे सामाजिक भान ठेवून साधेपणाने सोहळा पार पाडतात. टीव्ही अभिनेता विराज पटेल आणि अभिनेत्री सलोनी खन्ना यांनीही असाच आदर्श उभा केला आहे. naamkarann Fame Tv Actor viraf patel gets married to saloni khanna in court
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सेलिब्रिटीचं लग्न म्हटलं की, आलिशान मॅरेज हॉल अन् व्हीआयपी लोकांची उच्च बडदास्त ठेवली जाते. लग्नासाठी कुणी इटली गाठतं, तर कुणी पॅरिस! पण असेही काही जण आहेत जे सामाजिक भान ठेवून साधेपणाने सोहळा पार पाडतात. टीव्ही अभिनेता विराज पटेल आणि अभिनेत्री सलोनी खन्ना यांनीही असाच आदर्श उभा केला आहे. प्रसिद्ध ट्वीव्ही मालिका ‘नामकरण’ फेम अभिनेता विराफ पटेल आणि अभिनेत्री सलोनी खन्ना आता विवाहबद्ध झाले आहेत. या दोघांचे 6 मे रोजी मुंबईच्या वांद्रे कोर्टात लग्न झाले. त्यांच्या लग्नात मोठा उत्सव होण्याऐवजी दोघांनीही साध्या पद्धतीने लग्न करणे निवडले. इतकेच नाही तर या साध्या कोर्ट मॅरेजसाठी विराफ आणि सलोनी या जोडीने केवळ दीडशे रुपये खर्च केले आहेत.
विराफ पटेलने कोविड रुग्णांना आलिशान लग्नासाठी जमा केलेली रक्कम दान केल्याचे वृत्त आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्याने हा निर्णय घेतला. याबाबत विराफ म्हणाला, “माझं लग्न फक्त दीडशे रुपयांत झालं. आम्ही मॅरेज रजिस्ट्रारला 100 रुपये आणि फोटोकॉपीसाठी 50 रुपये दिले. मला आणि सलोनीला भव्य लग्न नको होते.”
View this post on Instagram A post shared by Saloni Khanna (@salk.04)
A post shared by Saloni Khanna (@salk.04)
ते पुढे म्हणाले, लग्नासाठी आम्ही जी काही बचत केली होती, ती कोरोनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही ती वापरणार आहोत. यामुळे आम्हाला आशा आहे की, आमचा विवाह आणखी अर्थपूर्ण होईल.”आपल्या निर्णयामुळे कुटुंबात काही प्रमाणात नाराजी असल्याचेही विराफने बोलून दाखवले. विराफ पटेल म्हणाला की, लग्नाच्या सोहळ्याने काही फरक पडत नाही, एखाद्या व्यक्तीची साथ असणे आवश्यक आहे. विराफ पटेल यांने सलोनी खन्नाला लग्नाची अंगठीही दिली नसल्याचे उघड केले. अंगठीऐवजी त्याने रबर बँड घातला.
त्याने हसत हसत सांगितले, “त्या वेळी अंगठी उपलब्ध नसल्यामुळे मी तिच्यासाठी आणू शकलो नाही. म्हणून मी तिच्या बोटात रबर बँड लावला.” सलोनी म्हणाली, “मी थोडीशी नर्व्हस आहे. चांगले होण्याची अपेक्षा करतेय आणि उत्साहितही आहे. मी जसा विचार केला होता, त्यापेक्षाही हे संस्मरणीय ठरले.” विराफच्या लग्नाला त्याचे मित्र आरती आणि नितीन मिरानी हजर होते. हे दोन्ही अभिनेते नुकतेच कोविडमधून बरे झाले. त्यांच्या मित्रांनीच विराफ आणि सलोनीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
naamkarann Fame Tv Actor viraf patel gets married to saloni khanna in court
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App