मेरा सोना दुबईसे आता है मशीन बनके, वर्षांत ८३३ किलो सोने जप्त


मेरा सोना दुबईसे आता है असे अमिताभ बच्चनला सांगणारा डॉन चित्रपटातील दावरसेठ सगळ्यांना आठवत असेल. सोन्याच्या बिस्किटांनी भरलेले बॉक्स आणल्याचे अनेक चित्रपटांतून पाहिले असेल. पण आता स्मगलरांनी नवनवीन शोध लावले आहेत. मशीनचे पार्ट बनवून सोने आणले जात आहे. गेल्या वर्षभरात ८३३ किलो महसूल गुप्तचर विभागाने जप्त केले आहे. My gold comes from Dubai as a machine, confiscating 833 kg of gold in a year


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मेरा सोना दुबईसे आता है असे अमिताभ बच्चनला सांगणारा डॉन चित्रपटातील दावरसेठ सगळ्यांना आठवत असेल. सोन्याच्या बिस्किटांनी भरलेले बॉक्स आणल्याचे अनेक चित्रपटांतून पाहिले असेल. पण आता स्मगलरांनी नवनवीन शोध लावले आहेत. मशीनच्या पार्टमध्ये लपवून सोने आणले जात आहे. गेल्या वर्षभरात ८३३ किलो महसूल गुप्तचर विभागाने जप्त केले आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हवाई मागार्ने होणाऱ्या सोने तस्करीचा पदार्फाश केला आहे. तब्बल ११ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून सोने आणण्यात आल्याची माहिती मिळाली होती. एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये दाखल साहित्याची तपासणी करण्यात आली. सफाई यंत्र आणि विविध उपकरणांचे सुटे भाग असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले होते.

परंतु, अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे बारकाईने तपासणी केली असता, संबंधित यंत्राच्या दोन मोटारमध्ये चकत्यांच्या स्वरूपात ५.८ किलो सोने लपवून ठेवल्याचे आढळले. त्याचे बाजारमूल्य ३.१० कोटी रुपये इतके आहे. याप्रकरणी दक्षिण मुंबईतून एकास अटक करण्यात आली आहे.

लखनौ विमानतळावर तर ५ मे रोजी डीआरआयने सोने तस्करीचा प्रकार उजेडात आणला. या विमानतळावर इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीनच्या आत सोने लपवून आणले होते. तपासणी केली असता ५.२ किलो सोने आढळून आले असून, त्याचे मूल्य २.७८ कोटी रुपये आहे. हे प्रकार उजेडात आल्यामुळे हवाई मालवाहतूक आणि कुरिअरच्या माध्यमातून होणाऱ्या तस्करीची नवी कार्यपद्धती शोधण्यास मदत झाली आहे. २०२१-२२ या कालावधीत तस्करी केलेले ८३३ किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी एकूण जप्त केले आहे. त्याचे मूल्य ४०५ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती देण्यात आली.

My gold comes from Dubai as a machine, confiscating 833 kg of gold in a year

 

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात