उमरखेड येथील डॉक्टरांचा खून, प्रकरणाचा उलगडा ; तिघांना अटक; हत्याकांडाचा सूत्रधार गेला पळून

विशेष प्रतिनिधी

यवतमाळ : उमरखेड येथील डॉ. हनुमंत धर्मकारे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. तिघांना अटक केली असून, मुख्य सुत्रधारार अजूनही फरार आहे. Murder of a doctor in Umarkhed, case solved; Three arrested; The mastermind of the massacre fled

सय्यद तौफिक सय्यद खलील, सय्यद मुस्ताक सय्यद खलील, शेख मोहसीन शेख कयूम, शेख मोहसीन शेख कयूम, अशी आरोपींची नावे आहेत.
मुख्य आरोपी शेख अब्बास शेख अब्राहिम हा फरार आहे.


Mansukh Hiren Murder Case : अशी झाली होती मनसुख हिरेनची हत्या, संपूर्ण कथा एनआयएच्या आरोपपत्रात!


2019 मध्ये डॉ. हनुमंत धर्मकारे हे रुग्णालयात ड्युटीवर असताना उमरखेडमधील अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करून वचपा काढण्यासाठी डॉक्टरवर गोळीबार केंल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यातून हे हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे.

मुख्य आरोपी पसारच असून त्याच्याशी संबंधित ढाणकी येथील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉक्टर धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, यासाठी उमरखेड शहर बंद ठेवले होते.

Murder of a doctor in Umarkhed, case solved; Three arrested; The mastermind of the massacre fled

महत्त्वाच्या बातम्या