विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर वाढत असताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कलम 144 लागू करण्याची घोषणा आज गुरुवारी केली. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत (7 जानेवारी) मुंबईत जमावबंदी (Section 144) लागू असेल. त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. Mumbai Section 144: Mumbaikars pay attention – eight-day curfew in the city – New Year parties too! New order in Nagpur too
वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.
Maharashtra | Section 144 imposed in Mumbai starting from today till 7th January 2022, in view of rising Covid cases Police prohibit New Year's celebrations, parties in any closed or open space incl restaurants, hotels, bars, pubs, resorts & clubs from Dec 30 Dec till Jan 7. — ANI (@ANI) December 30, 2021
Maharashtra | Section 144 imposed in Mumbai starting from today till 7th January 2022, in view of rising Covid cases
Police prohibit New Year's celebrations, parties in any closed or open space incl restaurants, hotels, bars, pubs, resorts & clubs from Dec 30 Dec till Jan 7.
— ANI (@ANI) December 30, 2021
“30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील” असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.
कोरोनाचा धोका वाढल्याने नागपूरमध्ये पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी 2,510 नवीन कोव्हिडग्रस्त रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत 8,060 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. सध्या मुंबईतील 45 इमारती सील आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App