एसटी महामंडळाने ४० निलंबित कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ


 

कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.ST Corporation releases 40 suspended employees


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर गेल्या दोन महिन्यांपासून ठाम आहेत.दरम्यान या कर्मचाऱ्यांना सरकार वारंवार कामावर हजर राहण्याचे आवाहन करत आहे.परंतु आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.बुधवारी एसटी महामंडळाने ४० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ६०३ वर पोहोचली आहे.याशिवाय आतापर्यंत महामंडळाने १०,७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १०,७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर २,७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.दरम्यान आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस दिली जात आहे.तर गेल्या १५ दिवसांत १५३९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून बजावली.

ST Corporation releases 40 suspended employees

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण