कोल्हापुरात होणार कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या


राज्यात यावर्षी २५ जिल्हा परिषद, २८३ पंचायत समित्या, १५ महापालिका तसेच अडीच हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत Transfer of officers who have completed their tenure will take place in Kolhapur


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार कोल्हापुरात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात एकाच पदावर तीन वर्ष काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.काल (ता. २९) ही सर्व माहिती महसूल विभागाकडे पाठवली गेली आहे.

या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

दरम्यान, यामध्ये करवीर व पन्हाळा तालुक्‍यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील दोन व दहा तहसीलदारांच्या बदल्या होऊ शकतात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कर्तव्यदक्ष व निष्पक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जातात.

राज्यात यावर्षी २५ जिल्हा परिषद, २८३ पंचायत समित्या, १५ महापालिका तसेच अडीच हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मार्च २०२२ पर्यंत ज्यांची एकाच जिल्ह्यात तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण झाला आहे.किंवा एखादा जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी आहेत, अशांची माहिती घेऊन त्यांची इतरत्र बदली केली जाणार आहे.

Transfer of officers who have completed their tenure will take place in Kolhapur

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात