मुंबई पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांवर FIR, नारायण राणे यांच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’त कोरोना प्रोटोकॉल मोडल्याचा आरोप

Mumbai Police registers FIR against BJP workers for breaking corona protocol in Narayan Rane Jan Ashirwad Yatra

Narayan Rane Jan Ashirwad Yatra : मुंबई पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. नारायण राणे यांच्या गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. Mumbai Police registers FIR against BJP workers for breaking corona protocol in Narayan Rane Jan Ashirwad Yatra


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. नारायण राणे यांच्या गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी मुंबई पोलिसांकडून एफआयआर नोंदवणे हे अत्यंत पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेसह सर्व पक्षांचे नेते राज्यभर राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. ज्यात मोठ्या संख्येने गर्दी जमा होत आहे. पण सत्तेत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. ते म्हणाले की, भाजपकडून जन आशीर्वाद यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिले जात आहेत आणि त्यांना मास्कचे वाटपही होत आहे.

‘कारवाई केली तरी भाजप मागे हटणार नाही’

भाजप नेते म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रेला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारच्या कारवाईनंतरही भाजप मागे हटणार नाही. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते चैतन्य सिरीप्रोलू म्हणाले की, नियम तोडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

महाराष्ट्राच्या चार केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. अलीकडेच नारायण राणे मोदी मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. संसदेत झालेल्या गदारोळामुळे पंतप्रधान मोदी त्यांची ओळख करून देऊ शकले नाहीत. म्हणूनच आता ते लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर हे राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झाले होते.

Mumbai Police registers FIR against BJP workers for breaking corona protocol in Narayan Rane Jan Ashirwad Yatra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात