पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक फीमध्ये कपातीचा निर्णय; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७०० महाविद्यालयांना आदेश


वृत्तसंस्था

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न ७०० महाविद्यालयांच्या शुल्कात ( फी मध्ये )२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कपात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.Pune University decides to reduce tuition fees; Order to 700 colleges on the background of corona

कोरोनामुळे विद्यापीठे, महाविद्यालये बंद असल्याने वापरण्यात न आलेल्या विविध शैक्षणिक सुविधांच्या शुल्कात २५ ते १०० टक्के शुल्क कपात लागू केली. या निर्णयामुळे पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या साधारण सात लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या पाल्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले आहे.

विद्यापीठे आणि महाविद्यालये दीड वर्षापासून बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पारंपरिक शिक्षणासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये कधी सुरू होतील, याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयांत कम्प्युटर कक्ष, ग्रंथालय, जिमखाना, प्रयोगशाळा अशा न वापरलेल्या सुविधांचे शुल्क माफ करावे, अशी मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती. 

या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुल्ककपात करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रक प्रसिद्ध करून विद्यापीठांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर, पुणे विद्यापीठाने सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

या समितीच्या अहवालाला व्यवस्थापन परिषदेत मान्यता मिळाल्यानंतर, शैक्षणिक विभागाकडून शुल्क कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालये, संस्था यांना लागू राहणार आहे, तर विद्यापीठे आणि महाविद्यालयाचे प्रशासन आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना कमी झालेले शुल्क भरण्यासाठी हप्ते देऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना लेखी अर्ज द्यावा, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी उपस्थित झाल्यावर पूर्ण शुल्क

कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर, विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना वापरल्या जाणाऱ्या सुविधांचे पू्र्ण शुल्क भरावे लागणार आहे, असेही परिपत्रकात सांगितले आहे.

ऑनलाइन, मुद्रित नियतकालिकांसाठी शुल्क

अनेक महाविद्यालये ऑनलाइन नियतकालिक प्रसिद्ध करतात. या महाविद्यालयांना २५ टक्के, तर मुद्रित नियतकालिक प्रसिद्ध करणाऱ्या महाविद्यालयांना ५० टक्के शुल्क घेण्याची मुभा आहे. नियतकालिक प्रसिद्ध न करणाऱ्या महाविद्यालयांना शुल्क घेता येणार नाही.

 • सुविधा – शुल्ककपात
 • (कपात टक्क्यांमध्ये)
 • औद्योगित संस्थांना भेटी – १००
 • कॉलेज मॅगझिन शुल्क – १००
 • सुरक्षा ठेव (डिपॉझिट) – १००
 • प्रयोगशाळा ठेव – १००
 • इतर ठेव – १००
 • आरोग्य तपासणी – १००
 • आपत्ती व्यवस्थापन – १००
 • अश्वमेध – १००
 • स्टुडंट वेल्फेअर – ७५
 • इतर शैक्षणिक उपक्रम – ५०
 • ग्रंथालय – ५०
 • प्रयोगशाळा – ५०
 • जिमखाना – ५०
 • कम्प्युटर कक्ष – ५०
 • परीक्षा – २५
 • विकास शुल्क – २५

महाविद्यालयांना नव्या शुल्काची नियामावली तयार करावी लागणार आहे. हे नवे शुल्क विद्यार्थ्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी भरावे लागणार आहे.

Pune University decides to reduce tuition fees; Order to 700 colleges on the background of corona

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*