चर्चा झाली दसरा मेळाव्यांच्या गर्दीची, पण त्यापलिकडे महागर्दी जमली होती मराठी गरब्याला!!… त्याचे काय?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दसरा होऊन 24 तास उलटल्यानंतरही शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांच्या गर्दीचा विषय अजून चर्चेतून जात नाही. किंबहुना मराठी माध्यमांनी त्या बातम्या अजूनही चर्चेत ठेवल्या आहेत. पण माध्यमांनी आणि काही प्रमाणात सोशल मीडियाने केवळ शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांच्या चर्चा घडवून दोन्ही शिवसेनांना त्याचा पूर्ण राजकीय इम्पॅक्ट मिळेल हे समजणे राजकीय आकलनातली चूक ठरू शकेल. कारण त्या पलिकडे मुंबई आणि परिसरात एक मोठा उपक्रम आणि तोही सलग 9 दिवस घेतला गेला आहे, तो भाजपच्या मराठी गरब्याचा!! Mumbai BJP arranged “marathi garba” proved very impactful, but marathi media ignored it

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गरबा उपक्रमाचे भाजपने पहिल्यांदा व्यापक प्रमाणावर आयोजन केले होते. सुरुवातीला काही प्रमाणात त्याला प्रसिद्ध जरूर मिळाली. पण ती सलग 9 दिवस नव्हती. वास्तविक मुंबईला आणि विशेषतः मराठी माणसाला व्यापून उरणारा हा मराठी गरबा सोहळा झाला आणि तो देखील सलग 9 दिवस याचा राजकीय इम्पॅक्ट कुठल्याही मेळाव्यापेक्षा जास्त खोलवर आणि अधिक विस्तृत आहे. इथे फक्त माध्यमांमधली चर्चा अपेक्षित नव्हती तर कार्यकर्त्यांचे नेटवर्क पूर्ण कामाला लावून आपल्या पक्षाच्या पलिकडे किंबहुना “पेरिफेरीयल लेव्हलच्या” पलिकडे जो मराठी समाज आहे, त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याची भाजपची योजना होती आणि ती योजना मराठी गरब्याचे एकूण आयोजनातले यश लक्षात घेता बव्हंशी यशस्वी झाल्याचे दिसून येते!!



दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आणि नागपूर आतला मुख्य कार्यक्रम हे दोन नियमितपणे असतातच. त्यामुळे भाजप स्वतंत्र दसरा मेळावा घेण्याची शक्यताच नव्हती. पण त्याआधी सलग 9 दिवस नवरात्रात मराठी गरब्याच्या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांचे नेटवर्क जे विस्तारले गेले, त्यातून मोठा राजकीय लाभ मिळवण्याची भूमी भाजपने पक्ष म्हणून तयार करून ठेवली आहे. त्या विषयाकडे मराठी माध्यमांनी दुर्लक्ष केले किंवा माध्यमांच्या ते फारसे लक्षात आलेले नाही.

पण पक्ष संघटना म्हणून मजबुतीकरणातला दीर्घ उपक्रम या दृष्टीने भाजपने आयोजित केलेल्या मराठी गरब्याच्या कार्यक्रमाकडे माध्यमांनी पाहिले असते तर त्याचे महत्त्व त्यांना कळणे फारसे अवघड नव्हते पण या दृष्टीने माध्यमांनी मराठी गरब्याच्या कार्यक्रमाकडे पाहिलेच नाही आणि त्यामुळे त्यांच्या आकलन कक्षेतून एवढा महत्त्वपूर्ण कार्यक्रम निसटू गेला. पण भाजपने माध्यमी चर्चेच्या आणि बातम्यांच्या पलिकडे जाऊन मराठी गरब्याचा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या भाजप कोणत्या पद्धतीची तयारी करतो आहे याचे इंगित मराठी गरब्याच्या कार्यक्रमात दडले आहे.

Mumbai BJP arranged “marathi garba” proved very impactful, but marathi media ignored it

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात