काही संकुचित मनोवृत्तीचे घटक लोकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आणि भीती निर्माण करत आहेत. ते केवळ लोकांचे आरोग्य आणि कल्याण याचे शूत्र नाहीत तर ते देशाचे देखील शत्रू आहेत. मुस्लिम समाजात असलेल्या लसीकरणाबाबतच्या अफवांचे खंडन करण्यासाठी आणि साशंकता दूर करण्यासाठी जागरुकता मोहीम सुरू करणार असल्याची माहिती अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. Mukhtar Abbas Naqvi said Awareness Campaign To Eliminate Doubts About Vaccination In Muslim Community
प्रतिनिधी
मुंबई : काही संकुचित मनोवृत्तीचे घटक लोकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आणि भीती निर्माण करत आहेत. ते केवळ लोकांचे आरोग्य आणि कल्याण याचे शूत्र नाहीत तर ते देशाचे देखील शत्रू आहेत. मुस्लिम समाजात असलेल्या लसीकरणाबाबतच्या अफवांचे खंडन करण्यासाठी आणि साशंकता दूर करण्यासाठी जागरुकता मोहीम सुरू करणार असल्याची माहिती अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.
नक्वी यांनी मुंबईत हज हाऊसमध्ये हज 2021 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. ते म्हणाले, भारतात सुरू असलेल्या लसीकरणाबद्दल लोकांमध्ये पसरवल्या जाणाºया अफवांचे खंडन करण्यासाठी आणि लसीकरणाबाबत असलेली साशंकतेची भावना दूर करण्यासाठी एक देशव्यापी मोहीम सुरू करण्यात येईल आणि त्यामध्ये विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्यात येईल, अशी माहिती नक्वी यांनी दिली. राज्यांच्या हज समित्या, वक्फ बोर्ड, त्यांच्याशी संबंधित संघटना, केंद्रीय वक्फ परिषद, मौलाना आझाद शिक्षण मंच आणि इतर सामाजिक आणि शैक्षणिक संस्था या मोहिमेचा भाग असतील.
हज यात्रेबाबत जरी आम्ही आमची सर्व तयारी केली असली तरी भारत सरकार सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयानुसार कार्यवाही करेल. काही देश त्यांच्या नागरिकांना हज 2021 साठी पाठवू शकत नाहीत, मात्र आम्ही सौदी अरेबिया सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहोत आणि सौदी अरेबिया सरकार जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार पुढचे पाऊल उचलू. नागरिकांचे आरोग्य आणि कल्याण यांना आमचे प्राधान्य आहे आणि मानवतेला देखील आहे, असे त्यांनी सांगितले.
नक्वी म्हणाले, कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी या संघटना आणि महिला बचत गट लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देतील आणि त्यांना लसी घेण्यासाठी प्रवृत्त करतील. जान है तो जहान है असे या मोहिमेचे नाव असेल आणि ही मोहीम विशेषत्वाने गावांमध्ये आणि देशाच्या दुर्गम भागात सुरू केली जाईल. काही गावांना भेटी दिल्यावर आलेल्या अनुभवांची माहिती देताना नक्वी म्हणाले, जागरुकतेच्या अभावामुळे लोकांमध्ये लसीकरण करून घेण्याबाबत साशंकतेची भावना आहे.
दरवर्षी मक्केच्या पवित्र शहरात 25 लाखांपेक्षा जास्त लोक हज यात्रा करतात. गेल्या वर्षी कोविड-19 महामारीमुळे सौदी अरेबिया सरकारने त्याच देशात राहणाऱ्या विविध देशांच्या नागरिकांपुरतेच मर्यादित हजचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. भारताचे सौदी अरेबियामधील राजदूत डॉ. औसाफ सईद, जेद्दाहमधील भारताचे कौन्स्युल जनरल शाहीद आलम आणि केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. भारतीय हज समितीचे सीईओ एम ए खान आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App