देशातील पंधरा लाख विद्युत कर्मचारी जाणार संपावर, सुधारित कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलन


विशेष प्रतिनिधी

मुंबई – देशातील वीज क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या व अभियंत्यांच्या संघटनांनी येत्या मंगळवारी (ता. १०) देशव्यापी संपावर जाण्याची हाक दिली आहे. देशातील १५ लाख कर्मचारी, अभियंते व अधिकारी ‘सुधारित विद्युत कायदा- २०२१’च्या विरोधात संपावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील २६ संघटना सहभागी होणार आहेत.MSEB and other workers will go on strike

हा कायदा खासगीकरणासाठी पोषक असून तो सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. कृष्णा भोयर यांनी केले आहे.यासंदर्भात कामगार संघटना केंद्र शासनाशी बोलणी करीत असून कोणत्याही परिस्थितीत हा ठराव पास करू देणार नाही, याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांनी पाठिंबा द्यावा व खासगीकरण रोखावे, असे आवाहन विविध संघटनांनी निवेदनाद्वारे केले आहे.

MSEB and other workers will go on strike

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण