विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा येत्या ४ ते ६ डिसेंबरला होईल.; तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा येत्या १८ डिसेंबर रोजी होणार आहे, असे एमपीएससीने जाहीर केले. विविध २०० जागांसाठी ही मुख्य परीक्षा होईल. MPSC Main exam will be held in Dec.
राज्य सेवा पूर्वपरीक्षा २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आली होती. या पूर्वपरीक्षेचा निकाल ६ सप्टेंबरला जाहीर झाला. सहायक राज्यकर आयुक्तर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त , उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी, नायब तहसीलदार अशा पदांसाठी ही परीक्षा झाली होती.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी झाली. दोन्ही पूर्व परीक्षांचे निकाल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाले. राज्य सेवा मुख्य परीक्षा ४ ते ६ डिसेंबरला, तर स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा १८ डिसेंबरला होईल. ती अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App