प्रतिनिधी
मुंबई : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदांच्या एकूण 588 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.MPSC: Government job opportunities; Recruitment of officers in Forest, Agriculture, Water Conservation Departments
नियम आणि अटी
परीक्षेचे नाव – MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021
पदाचे नाव – वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता,
उपविभागीय जलसंधारण अधिकारी
पद संख्या – 588 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज शुल्क – अमागास – रु. 544/- मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग – रु. 344/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जुलै 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील.
अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App