एमपीएससी परीक्षेत प्रमोद चौगुले राज्यात प्रथम इतिहासात प्रथमच आयोगाकडून तात्काळ निकाल जाहीर


एमपीएससी)तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०चा अंतिम निकालाची गुणवत्ता यादी शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली. त्यात सांगलीच्या प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक तर सोलापूरच्या नितेश नेताजी कदम याने दुसरा क्रमांक मिळवला, तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०चा अंतिम निकालाची गुणवत्ता यादी शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आली. त्यात सांगलीच्या प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक तर सोलापूरच्या नितेश नेताजी कदम याने दुसरा क्रमांक मिळवला, तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. एमपीएससीच्या इतिहासात प्रथमच अंतिम मुलाखत पार पडल्यानंतर अडीच तासात आयोगाकडून तात्काळ निकाल जाहीर करण्यात आला आहे.MPSC exam result declared, pramod chaugule first in the state

आयोगाकडून डिसेंबर २०१९ मध्ये १५ संवर्गातील २०० पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल २०२०मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा चार वेळा पुढे ढकलावी लागली,त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते. अखेर मार्च २०२१मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली होती. पूर्व परीक्षेसाठी तब्बल २ लाख ६२ हजार ८९१ उमेदवारांनी नोंदणी केली,तर १ लाख ७१ हजार ११६ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२१मध्ये जाहीर करण्यात आला. ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ हजार ८६३ उमेदवारांनी डिसेंबर २०२१मध्ये मुख्य परीक्षा दिली. त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ६१५ उमेदवारांपैकी ५९७ उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर १८ ते २९ एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन तात्काळ अंतिम निकालाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्याने उमेदवारांना सुखद धक्का बसला.

वर्ग एकची पदे भरली जाणार

या परीक्षेत 612 गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले हा प्रथम आला आहे. त्यानंतर नितेश नेताजी कदम हा 591 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर रुपाली गणपत माने हिने 580.25 गुण मिळवून मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेद्वारे वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत. या परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार ही पदे भरण्यात येणार नव्हती.

तर इतर वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत. यंदाच्या निकालात ग्रामीण भागातील मुलांनी चांगल्या प्रकारे यश मिळवले आहे. एमपीएससीने ज्या गतीने निकाल जाहीर केला ती पद्धत कौतुकास्पद आहे,अशाप्रकारे त्यांनी भविष्यात वेगवान पद्धतीने काम करावे अशी अपेक्षा पुण्यातील ज्ञानदीप अकादमीचे संचालक महेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

म्हेव्हणा आणि भावजी राज्यात प्रथम

एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात यंदाच्या वर्षी प्रथम आलेला प्रमोद चौगुले यांचा मेव्हणा प्रसाद चौगुले राज्यात मागील वर्षी एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आले होते. मेकॅनिकल इंजिनीअर असलेले प्रमोद चौगुले सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात सोनी गावचे रहिवासी आहेत त्यांचे वडील बाळासाहेब चौगुले टेम्पो चालक आसून आई शारदा चौगुले या शिवणकाम करतात. तर पत्नी प्रेरणा चौगुले नोकरी करते आणि दोन वर्षाची मुलगी ओवी हीचा ही सांभाळ करते.

कुटुंबीयांनी गावाला थांबून अभ्यासाकरीता मला पुण्याला पाठवत पूर्ण सहकार्य केल्याने या परीक्षेत चांगल्या प्रकारचे यश मिळवू शकलो अशी भावना प्रमोद चौगुले यांनी व्यक्त केली आहे. सदर परीक्षेत राज्यात दुसरा आलेल्या नितेश कदम याचे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएस्सी पर्यंत शिक्षण झाले आहे. सोलापूर येथील तो रहिवासी असून त्याचे वडील शेती करतात तर, आई शिक्षिका आहे. कुटुंबियांच्या पाठबळामुळे हे यश मिळवू शकले असे त्याने सांगितले.

MPSC exam result declared, pramod chaugule first in the state

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण