MP Sambhajiraje chhatrapati : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधिमंडळाचे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली होती. या सर्वांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा होईल. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी नियुक्त्या या व इतर मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना खडाजंगी उडत आहे. दरम्यान, सरकारने या अधिवेशनात काही घोषणा केली नाही तर मूक आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे भाजप खा. संभाजी राजे छत्रपती म्हणाले आहेत. MP Sambhajiraje chhatrapati criticizes MVA govt over MPSC passed Youth Swpanil Lonkar Suicide
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधिमंडळाचे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली होती. या सर्वांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा होईल. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी नियुक्त्या या व इतर मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना खडाजंगी उडत आहे. दरम्यान, सरकारने या अधिवेशनात काही घोषणा केली नाही तर मूक आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे भाजप खा. संभाजी राजे छत्रपती म्हणाले आहेत.
संभाजीराजे म्हणाले की, विदर्भातील मराठा कुणबी झाले, दोन्ही एकत्र आहेत. कुणबी समाजाला आरक्षण मिळतेय, पण मराठ्यांना नाही. स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली, तो असेल मराठा समाजाचा. त्याची निवड झाली. पण त्याला मुलाखतीला बोलावलं नाही. मग एमपीएससीच्या परीक्षा घेता कशाला? नेमणूक करता येत नसेल तर यात सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारला दिलेली मुदत संपत आली आहे. या अधिवेशनात काही घोषणा केली नाही, तर मूक आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
ते पुढे म्हणाले की, नक्षलवाद्यांना सांगू इच्छितो की, शिवाजी महाराजांनी कधी कायदा हातात घेतला नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं. नक्षलवाद्यांना शिवबांचा पाईक व्हायचं असेल तर त्यांनी मुख्य प्रवाहात यावं. दुसरीकडे, विधानसभा अधिवेशनात MPSCच्या कारभाराची चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधकांसह राज्यभरातील तरुणांनी केली आहे. दोन वर्षांपासून नियुक्त रखडल्या आहेत. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींना मुहूर्त लागला नसल्याची तीव्र भावना तरुणांमधून व्यक्त होतेय.
MP Sambhajiraje chhatrapati criticizes MVA govt over MPSC passed Youth Swpanil Lonkar Suicide
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App