वडेट्टीवारांपाठोपाठ खासदार कृपाल तुमानेंची जीभ घसरली; म्हणाले, कंगनाला काय काय चाटून पद्मश्री मिळालीये, हे सर्वांना माहितीय!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताला भिकेमध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधी यांचा क्रांतिवीर भगतसिंग यांच्या फाशीला पाठिंबा होता, अशी स्वैर मुक्ताफळे उधळणार्‍या कंगना राणावतवर देशात सगळीकडून टीकेचा भडिमार होताना दिसतो आहे. पण तिच्यावर टीका करताना अनेकांच्या जिभा सुटल्या आहेत. तिने स्वतः मुक्ताफळे उधळली आहेतच, पण तिच्या टीकाकारांच्या ही मुक्ताफळांची स्टॅंडर्ड काही वरचे नाही.MP Kripal Tumane’s tongue slipped after Vadettiwara

काल काँग्रेसचे महाराष्ट्रातले मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना राणावत हिला “नचनिया” म्हणून घेतले, तर आज शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी कंगनावर त्याहीपेक्षा खालच्या भाषेत टीका केली आहे.

महात्मा गांधी हे सत्तापिपासू असते तर त्यांना त्यावेळी राष्ट्रपती पंतप्रधान अशी कोणती पदे स्वीकारता आली असती पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कंगनाला कुणाचे पाय साठवून आणि कुणा कुणाचे काय काय चाटून पद्मश्री मिळाली आहे दिल्लीतल्या खासदार आमदारांना विचारा ते सगळ्यांना माहिती आहे, अशा शेलक्या शब्दांत मध्ये कृपाल तुमाने यांनी कंगना राणावत हिच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याबाबत वक्तव्य करताना कंगना एक पायरी उतरली तर तिचे टीकाकार दहा पायऱ्या उतरून खाली आले आहेत.

MP Kripal Tumane’s tongue slipped after Vadettiwara

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात