मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम तसेच लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे मोहन जोशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अनेक कलाकारांना देखील कोरोनाचा विळखा घातला आहे. मराठी अभिनेते मोहन जोशी यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे स्वतः सोशल मीडियावर सांगीतले . विशेष म्हणजे मोहन जोशी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आणि त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. Mohan Joshi tests positive for COVID-19 after taking both doses of Vaccine
याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मोहन यांनीकाही दिवसांपूर्वीच लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सुनबाई’ या मालिकेत काम करत आहेत . महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मालिकांचं शूटींग बंद करण्यात आलं. त्यानंतर या मालिकेचं शूटींग गोव्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोहन जोशी यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम गोव्यात होती. त्याचवेळी मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली.
मोहन जोशी यांना कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. सध्या मोहन जोशी गोव्यामध्ये क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र गोव्यातही सध्या लॉकडाऊन लागलं असून मालिकेचं शूटींग बंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App