मोहन देलकर यांच्या पत्नी शिवसेनेत; दादरा नगर हवेलीतून लोकसभेची उमेदवारी!!


प्रतिनिधी

दादरा नगर हवेली : दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कलाबेन देलकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.Mohan Delkar’s wife in Shiv Sena; Lok Sabha candidature from Dadra Nagar Haveli

कला बेन देलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उमेदवारी कला बेन देलकर यांना देण्याची शक्यता आहे.शिवसेनेच्या या रणनीतीमुळे भाजपला धक्का बसण्याची अटकळ प्रसारमाध्यमांनी बांधली आहे. प्रत्यक्षात भाजपचे काम दादरा नगर हवेली मध्ये गेल्याच आठवड्यात सुरू झाले असून आज सकाळी भाजपने आदिवासी नेते महेश गावित यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

आता त्यांच्यासमोर शिवसेनेतून कै. मोहन देलकर यांच्या पत्नी कलाबेन देलकर आव्हान उभ्या करणार असल्या तरी काँग्रेसकडून नेमके कोण उमेदवार असणार आहे? की काँग्रेस पक्ष कला बेन देलकर यांनाच पाठिंबा देऊन भाजपला एकास एक टक्कर देण्यासाठी पुढे चाल देणार आहे,

हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.मोहन बेलकर यांनी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये येऊन आत्महत्या केल्याने दादरा नगर हवेलीची लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.

Mohan Delkar’s wife in Shiv Sena; Lok Sabha candidature from Dadra Nagar Haveli

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”