नाशिक मध्ये मोगलाई : नववर्ष स्वागत कार्यक्रमांची परवानगी मागायला माझ्यासमोरच आले नाहीत; पोलिस आयुक्त दीपक पांडेंचा समितीवर आरोप!!


प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमध्ये कार्यक्रमाला परवानगी देण्यावरून नववर्ष स्वागत समिती आणि पोलीस आयुक्तांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. त्याचाच पुढचा अंक आज पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. पोलीस आयुक्तांवर दबाव आणणे योग्य नाही. तुम्ही इथे येऊन परवानगी घ्यायला पाहिजे. माझी ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत माझे आदेश मी मागे घेणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट शब्दात सुनावले कदाचित माझी ट्रान्सफर झाल्यावर तुम्हाला माझे महत्त्व कळेल, Moghlai in Nashik: They did not come to me to ask permission for New Year reception; Police Commissioner Deepak Pandey accuses the committeeCharity snatches Rs 50,000 help for wife Kareena’s death

असा दावाही पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केला नववर्ष स्वागत समितीने दबाव टाकला आहे. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह बोलणे कसे सहन करणार?, मी त्यांना बोलावलं, तेव्हा त्यांनी नकार दिला, अशा शब्दांत पोलीस आयुक्त पांडेय यांनी नववर्ष स्वागत समितीला उत्तर दिले.नाशिकमध्ये गुढीपाडव्याचे सर्व सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय नववर्ष स्वागत समितीने घेतला. या मुद्द्यावर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांच्या आठमुठ्या धोरणाचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीचे प्रफुल्ल संचेती आणि नितीन वारे यांनी दिली होती.

शिवाय शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आडकाठी आणली. त्यामुळे गुढीपाडव्याला शहरात होणारे महारांगोळी, महावादन आणि अंतर्नाद हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यानी जाहीर केले होते. नववर्ष स्वागत समितीने कार्यक्रम रद्द करण्याच्या मुद्यावर आरोपाचा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

कायद्यावरच समाज चालतो…

पोलीस आयुक्त म्हणाले, संविधानाच्या तरतुदी व पोलीस ॲक्ट अंतर्गत सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. कोरोनाचा आणि परवानगी घेण्याचा काही संबंध नाही. परवानगी बंधनकारक केल्याने शहराला शिस्त लागली. वर्षभरात 833 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 598 ला परवानगी दिली. कायद्यावरच समाज चालतो. हे नागरिकांनी समजून घ्यावे. लोकहितासाठीच्या दृष्टीने नियमावली जाहीर केली आहे. 17 फ्रेबुवारी 2021 नुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे.

परवानगी द्यावीच असे नाही…

पोलीस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले की, प्रत्येक नागरिकांना रस्त्यांचा वापर करण्याचा अधिकार आहे. राजकीय पक्षांना विशेष मुभा दिलेल्या असतात. मात्र, त्यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करतो. विविध सामाजिक संस्थावर धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक असते. कोणी अर्ज केला, तर त्यास परवानगी दिलीच पाहिजे असा नियम नाही. पोलीस आयुक्तावर कोणी दबाब आणत असेल, तर ते योग्य नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मीडियाच्या माध्यमातून चर्चा नको…

पांडेय म्हणाले की, शहरात एकही रास्ता रोको झालेला नाही. परवानगी नाकारण्यात व्यक्तीगत हेतू नाही. शासनाच्या आदेशाप्रमाणेच कार्य करतो. अर्ज दिल्यानंतर सात दिवसांच्या आत परवानगी देण्याच्या प्रयत्न असतो. पोलीस आयुक्त तुमच्या हिताचे निर्णय घेत आहेत. गुढी पाडव्याच्या यात्रोत्सव परवानगीसाठी आयोजकांनी यायला हवे. मीडियाच्या माध्यमातून चर्चा नको, असे आवाहन त्यांनी केले.

आक्षेपार्ह बोलणे सहन करणार नाही…

पोलीस आयुक्त म्हणाले की, इथे येऊन परवानगी घ्यायला पाहिजे. माझी ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत माझे आदेश मी मागे घेणार नाही. कदाचित माझी ट्रान्सफर झाल्यावर तुम्हाला महत्त्व कळेल. नववर्ष स्वागत समितीने दबाव टाकला. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह बोलणे कसे सहन करणार. मी त्यांना बोलावलं, तेव्हा त्यांनी नकार दिला. खासगी संस्था पब्लिक प्लेसवर कार्यक्रम करणार आणि पोलीस आयुक्तांबद्दल चुकीचे बोलत असतील तर काय करणार, असा सवालही आयुक्तांनी केला.

Moghlai in Nashik: They did not come to me to ask permission for New Year reception; Police Commissioner Deepak Pandey accuses the committeeCharity snatches Rs 50,000 help for wife Kareena’s death

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था