पुष्पा चित्रपटातील “श्रीवल्ली’ सारखी दिसते म्हणत एका तरुणीची छेड काढण्यात आली. तीला भर रस्त्यात मिठी मारुन विनयभंग करण्यात आला याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –पुष्पा चित्रपटातील “श्रीवल्ली’ सारखी दिसते म्हणत एका तरुणीची छेड काढण्यात आली. तीला भर रस्त्यात मिठी मारुन विनयभंग करण्यात आला. पिडीतेचा भाऊ सोडविण्यास आला असता त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना धनकवडी येथील शंकर महाराज वसाहत येथे घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सोहेल आणि अरबाज (दोघेही रा.शंकर महाराज वसाहत, धनकवडी,पुणे) यांच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.Shakarnagar police registered crime against Pune’s pushpa
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एका 20 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे.पिडीत तरुणी घराबाहेर थांबली असता, दोघे आरोपी तेथे दाखल झाले. तेथे दोघेही तीच्याकडे बघुन शिट्टया मारु लागले. तीने दोघांना याचा जाब विचारला. तेव्हा सोहेलने तु पुष्पा चित्रपटातील हिरोईनसारखी दिसतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’
असे म्हणत तीचा हात धरुन मिठी मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर पिडीतेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता, तीचा भाऊ मदतीला धाऊन आला. यावेळी त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत हातानो मारहाण करण्यात आली. पिडीतेने आरडा ओरडा केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस लोंढे करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App