ठाकरे सरकारला पाठिंबा दिला म्हणून काय झाले? काँग्रेस नेते नसीम खान शिवसेनेविरुद्ध सुप्रीम कोर्टात लढणारच!!


प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला पाठिंबा दिला असला म्हणून काय झाले? आपण शिवसेनेविरुद्ध सुप्रीम कोर्टात केस लढणारच, असा पवित्रा काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांनी घेतला आहे. नसीम खान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात केस दाखल केली आहे. ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्याचा त्यांचा निर्धार आहे. What happened as Thackeray supported the government

– 2019 चे आचार संहिता भंगाचे प्रकरण

नसीम खान विरुद्ध दिलीप लांडे हे प्रकरण 2019 च्या विधानसभा निवडणुकीतले आहे. विधानसभेचा प्रचार संपलेला असताना देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब आणि शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी प्रचार केला. आचारसंहितेचा भंग केला. या विरोधात नसीम खान यांनी केस दाखल केली आहे. दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा 409 मतांनी पराभव केला होता. त्याविरोधात दाद मागताना नसीम खान यांनी ठाकरे, परब आणि लांडे यांनी आचारसंहिता भंग करून प्रचार केल्याचा दावा केला आहे. 19 ऑक्टोबर 2019 ला सायंकाळी 5.00 वाजता प्रचार संपला तरी देखील उद्धव ठाकरे अनिल परब आणि दिलीप लांडे यांनी 20 ऑक्टोबरला प्रचारसभा घेतली. पदयात्रा देखील काढली. यातून आचारसंहितेचा त्यांनी भंग केला आहे. याबद्दल मी कोर्टात सुप्रीम कोर्टात न्याय मागतो आहे, असे नसीम खान म्हणाले.

– दोन विषय वेगळे

काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला ही घटना 2019 च्या निवडणुकीनंतरची आहे. ठाकरे सरकारला काँग्रेसने किमान समान कार्यक्रमावर आधारित पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचा माझ्या केसशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मी केस सुप्रीम कोर्टापर्यंत लढणारच आहे, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकरणात भाजपच्या हातात आयते कोलीत देण्याचा मुद्दाही उपस्थित होत नाही, असा दावाही नसीम खान यांनी केला आहे.

What happened as Thackeray supported the government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात