१० नोव्हेंबर रोजी मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करणार – आमदार गोपीचंद पडळकर


 

थकित वेतन, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे काही एस.टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. या आत्महत्यांमुळे एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.MLA Gopichand Padalkar will stage agitation outside the Ministry on November 10 with children


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे. तसेच वेतन व इतर मुद्यांवरून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता भाजपने सहभाग घेतला आहे.भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला.येत्या १० नोव्हेंबर रोजी मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करू , त्या ठिकाणी उघड्यावर संसार मांडू आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.


WATCH : एसटीचे विलिनीकरण सरकारमध्ये करावे गोपीचंद पडळकर यांची परिवहन मंत्र्यांना विनंती


थकित वेतन, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे काही एस.टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. या आत्महत्यांमुळे एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून अनेक एस.टी कर्मचारी काही ठिकाणी आगार बंद ठेवून आंदोलन करत आहे. त्यात आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांपैकी मागील काही दिवसात 31 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीन जणांचे प्राण देवच्या कृपने वाचले. 28 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला, तरी तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

MLA Gopichand Padalkar will stage agitation outside the Ministry on November 10 with children

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात