चांदणी चौकात अपघातातून आमदार चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले


विशेष प्रतिनिधी

पुणे : अचानक उतारावरून दुचाकी घसरून गर्दीवर आदळल्याने झालेल्या अपघातातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले. चांदणी चौकात बुधवारी हा प्रकार घडला. MLA Chandrakant Patil escaped from the accident at Chandni Chowk

चांदणी चौक येथील कामाची पाहणी करायला आमदार चंद्रकांत पाटील आले होते. चांदणीचौक येथील उतारावर पत्रकारांशी संवाद सुरू असताना तीव्र उतारावरुन एका चालकाची दुचाकी घसरल्याने तो गर्दीवर आदळला. सुदैवाने कार्यकर्त्यांची फळी बाजूला असल्याने पाटील यांना इजा झाली नाही. काही महिला पत्रकार सुध्दा थोडक्यात बचावल्या.



दुचाकीस्वार मद्यप्राशन करून आला असावा असे वाटून कार्यकर्त्यांनी त्यास मारायला सुरवात केली. मात्र थांबा त्याला मारू नका असे म्हणत पाटील यांनी त्याची विचारपूस केली.

दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना अधिका-यांनी चांगले काम केले तर त्यांना चॉकलेट देणार असे पाटील यांनी सांगितले.

मात्र चांदणी चौकातील कामा बाबत आपण समाधानी नाही परंतु कामासाठी काही वेळही देणे गरजेचे आहे असे पाटील यांनी यावेळी सांगितले. काम चांगले करावे म्हणून चॉकलेट देत आहे असे सांगत दादांनी अधिका-यांना चॉकलेट दिले.

MLA Chandrakant Patil escaped from the accident at Chandni Chowk

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात