राज्यात २०२२ ते २०२५ पर्यंत ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येणार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात ‘मिशन महाग्राम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी कृषी आधारित बाजारपेठा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. ग्रामीण गृहनिर्माणास चालना देणे, ग्रामीण भागात उपजीविका माध्यम निर्मिती करणे अशा विविध लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी ही योजना आहे. ‘Mission Mahagram’ will be implemented in the state from 2022 to 2025

मिशन महाग्रामअंतर्गत मानव विकासाच्या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून विकासाचे शाश्वत ध्येय साध्य केले जाईल. सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यासोबत बहुआयामी भागीदारी विकसित करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील. त्यातून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे.



या विकासकामासाठी देशातील कॉपोरेट तसेच खाजगी कंपन्यांनी जास्तीत जास्त निधी देऊन राज्याच्या ग्रामीण विकासाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, अशी शासनाची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्रातील अन्न, वस्त्र, निवारा, आरोगय, पाणी, शिक्षण व उपजिवीका या क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रीत केले जाईल. कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून शाश्वत विकास करण्यासाठी सन २०२२ ते २०२५ या दरम्यान श मिशन महाग्राम अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर ही माहिती दिली.

‘Mission Mahagram’ will be implemented in the state from 2022 to 2025

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात