Young Brigade of Congress ! मिलींद देवरा ; ज्योतिरादित्य सिंधिया-जितिन प्रसादच अनुकरण करणार का? एक ट्विट-भाजप सरकारचं कौतुक; कॉंग्रेससाठी मोठा धक्का


काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील बडे नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला झटका बसला.


मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट करून गुजरात सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे.


सचिन पायलट आणि मिलिंद देवरा हे कॉंग्रेसच्या तरूण नेत्यांपैकी एक आहेत. ज्यांची नाराजी ही कायमच चर्चेचा विषय ठरते.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॉंग्रेस पक्षात बऱ्याच दिवसांपासून नाराज असलेले माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही राजकीय उलथापालथ ही कॉंग्रेससाठी एक मोठा धक्का आहे.राजस्थानमधील काँग्रेसचे बडे नेते सचिन पायलट हे ही नाराज असल्याचं बोललं जात आहे.या सगळ्या दरम्यान, आता अचानक मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे चर्चेत आले आहेत. मिलिंद देवरांनी गुजरात सरकारच्या कामाचे कौतुक केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. Milind Deora; Will Jyotiraditya follow Scindia-Jitin Prasad?

मिलिंद देवरा यांनी गुजरात सरकारच्या कामाला अनुकरणीय म्हणत कॉंग्रेसची चिंता मात्र वाढविली आहे. जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या काही वेळानंतरच कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सीएमओ गुजरातचे एक ट्विट शेअर केलं. यावेळी गुजरात सरकारचे काम चांगले असल्याचे वर्णन केले आहे.

देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘इतर राज्यांनी अनुकरण करावं असं हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. करोनाच्या संकटामुळे गजरातमध्ये हॉटेल उद्योग, रेस्टॉरंट, रिसॉर्ट आणि वॉटर पार्क बंद आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहता मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांचा एक वर्षाचा मालमत्ता कर आणि वीज बिल माफ केले आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे. तसंच गुजरात सरकारचे कौतुक केले आहे. इतर राज्यांनी अनुकरण करावे, असे स्वागतार्ह पाउल आहे. देशातील पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्यांचे आणखी नुकसान रोखण्यासाठी सर्व राज्यांनी तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे, असं मिलिंद देवरांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

दुसरीकडे मिलिंद देवरा यांनी आपले माजी सहकारी जितिन प्रसाद यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर कठोर विधान केले आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ‘माझा विश्वास आहे की कॉंग्रेसने आपले जुने स्थान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कॉंग्रेस हा देशातील एक मोठा पक्ष आहे आणि त्या दृष्टीने तेही हे काम पुन्हा करू शकतात आणि ते त्यांनी केलेही पाहिजे. आपल्याकडे अजूनही असे नेते आहेत ज्यांना ताकद दिली गेली आणि त्यांचा उत्तम प्रकारे उपयोग केल्यास ते चांगला निकाल देऊ शकतात.’

दरम्यान, एक काळ असा होता की, जेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद आणि सचिन पायलट हे कॉंग्रेसच्या युवा ब्रिगेडचे दिग्गज नेते मानले जात होते. हे नेते यापूर्वीही कॉंग्रेस सरकारमध्ये होते.

या चार नेत्यांपैकी सर्वात आधी सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर काही महिन्यांपूर्वीच सचिन पायलट यांनी देखील पक्षात बंड केलं होतं. आता जितिन प्रसाद हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे.

सचिन पायलट आणि मिलिंद देवरा यांनी अनेकदा पक्षात सुधारणांची मागणीही केली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते खूपदा चर्चेत असतात. आता मिलिंद देवरा यांच्या नव्या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Milind Deora; Will Jyotiraditya follow Scindia-Jitin Prasad?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात