प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो माईंडगेम खेळायला सुरुवात केली आहे त्यामध्ये आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भर घातली आहे. शिंदे फडणवीस सरकार पाच – सहा महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असे आवाहन शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले आहे. आता तसे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. Mid term polls : after sharad Pawar Uddhav Thackeray also challenged BJP to hold mid term polls
भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर आपले चुकले असेल तर जनता आपल्याला घरी बसवेल. जर ते चुकले असतील तर त्यांना घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले.
– उद्धव ठाकरे सक्रिय
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संघटनेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थितांना संबोधित केले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या सरकारवर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्रातील नवे शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App