लतादीदींचे शिवतीर्थावर स्मारक : संजय राऊतांच्या सूरात मिसळला मनसेने सूर!!

  • शिवाजी पार्काचा राजकारणासाठी बळी देऊ नका! संदीप देशपांडेंनी का केले ट्विट?

प्रतिनिधी

मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर, या मैदानातच त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जे ट्विट केले आहे, त्यावरून आता लतादीदींच्या स्मृतीस्थळाबाबत मनसेची भूमिका नक्की काय आहे, याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. Memorial of Latadidi on Shivteertha: MNS mix with Sanjay Raut’s tune !!

संदीप देशपांडे यांचे ट्विट ही मनसेची भूमिका असते, असे सर्वसाधारण समजले जाते. त्यामुळे शिवाजी पार्कसंबंधी त्यांनी केलेले ट्विट आता चर्चेत आले आहे. संदीप देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.

एक प्रकारे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या सुरात मनसेने सूर मिसळल्याने यानिमित्ताने दिसत आहे.

लतादीदींवर शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार केल्यावर त्या दिवशी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लतादीदींचे शिवाजी पार्क येथेच बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे स्मृतीस्थळ बांधण्याची मागणी केली. त्यानंतर लागलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनीही मागणी केली. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्ही लता दीदींचे भव्य स्मारक उभारणार आहोतच, कुणीही मागणी करून राजकारण करण्याची गरज नाही, असे म्हटले. अशा रीतीने लता दीदींच्या स्मृतीस्थळाच्या विषयावर राजकरण सुरु झाले आहे. मनसेने देखील संजय राऊत यांच्या सुरात सूर मिसळून असे दिसत आहे.

Memorial of Latadidi on Shivteertha: MNS mix with Sanjay Raut’s tune !!