Director Kedar Shinde : मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आरोग्य सुविधांच्या तुटवड्यावरून सरकारला दोष देत आजही ब्रिटिशच असायला हवे होते, असे मत आपल्या फेसबुक वॉलवर व्यक्त केले आहे. सध्या अवघ्या जगाला कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडलं आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर सर्वात जास्त ताण आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येच्या देखभालीसाठी सोयीसुविधा अपुऱ्या पडणं हेही स्वाभाविक आहे. कारण अशा महामारीसाठी कोणताही देश सज्ज नव्हता, तहान लागल्यावर विहीर खोदायची माणसाची सवय याही वेळी दिसून आली. प्रगत म्हणवली जाणारी पाश्चिमात्य राष्ट्रेदेखील याला अपवाद नाहीत. महामारीविरुद्ध व्यवस्थापन करणे हे मोठे कौशल्याचे काम आहे. बड्या राष्ट्रांनाही आपल्या तोकड्या आरोग्य सुविधांमुळे लॉकडाऊनच लावावा लागला. यामुळेच तेथे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास व वैद्यकीय सुविधा उभारण्यात वेळ मिळाला. Marathi Director Kedar Shinde said- India Must Have Britishers Today; Read Comparision Of india and UK Corona pandemic situation
विशेष प्रतिनिधी
मुंबई : इतिहासात अनेकदा महामारी आल्याचे दाखले आहे. दर शतकात कोणती ना कोणती महामारी आली आहे. सध्याही अवघ्या जगाला कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडलं आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर सर्वात जास्त ताण आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येच्या देखभालीसाठी सोयीसुविधा अपुऱ्या पडणं हेही स्वाभाविक आहे. कारण अशा महामारीसाठी कोणताही देश सज्ज नव्हता, तहान लागल्यावर विहीर खोदायची माणसाची सवय याही वेळी दिसून आली. प्रगत म्हणवली जाणारी पाश्चिमात्य राष्ट्रेदेखील याला अपवाद नाहीत. महामारीविरुद्ध व्यवस्थापन करणे हे मोठे कौशल्याचे काम आहे. बड्या राष्ट्रांनाही आपल्या तोकड्या आरोग्य सुविधांमुळे लॉकडाऊनच लावावा लागला. यामुळेच तेथे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास व वैद्यकीय सुविधा उभारण्यात वेळ मिळाला. भारतही सध्या अशाच अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजना, वैद्यकीय सुविधांची उभारणी याच बरोबर लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. परंतु आता मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आरोग्य सुविधांच्या तुटवड्यावरून सरकारला दोष देत आजही ब्रिटिशच असायला हवे होते, असे मत आपल्या फेसबुक वॉलवर व्यक्त केले आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) आपल्या फेसबुक पोस्टवर म्हणाले की, “भविष्यात वीज/गॅस प्रमाणे #Oxygen वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको.. स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण, दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वास सुध्दा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करून दिला नाही. ब्रिटिश हवे होते अजून काही वर्ष.. आता ते हवे होते म्हणजे… किमान या जगण्याच्या महत्वाच्या सोई तरी व्यवस्थीत करून दिल्या असत्या!!!!”
वास्तविक, कोरोना महामारीने ब्रिटनमध्येही मोठा धुमाकूळ घातलेला आहे. पुढारलेले म्हणवल्या जाणाऱ्या ब्रिटिशांनीही कडक लॉकडाऊन, रुग्णालयांत फक्त अतिगंभीर रुग्णांवर उपचारांचा नियम, मास्क व शारीरिक अंतराचे सक्तीने पालन, काँटॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग अशाच बाबींच्या आधारावर नियंत्रण मिळवले आहे.
हा तुलनात्मक तक्ता (india and UK Corona Comparison) पाहिल्यास कुणाच्याही सहज लक्षात येईल की, एवढी मोठी लोकसंख्या असूनही भारतात ब्रिटनच्या तुलनेत खूप कमी मृत्यू झाले आहेत. ब्रिटनसारखा मृत्युदर भारतात असता तर देशात फार मोठ्या लोकसंख्येला जीव गमवावा लागला असता. ब्रिटनमध्येही मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा आहेत, तरीही तेथे मोठ्या संख्येने जीव गेले. त्या मानाने भारतात दिलासादायक नसली तरी वेगळी परिस्थिती आहे. यामुळे किमान महामारीच्या बाबतीत तरी भारताची आणि ब्रिटनची तुलना चुकीची ठरते.
जानेवारी ते मार्च या काळात जेव्हा ब्रिटनमध्ये कोरोना धुमाकूळ घातला होता, तेव्हा तब्बल 70 हजार ब्रिटिशांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये धुमाकूळ घालणारा डबल म्युटंट व्हायरसच आता भारतात धुमाकूळ घालत आहे. याला अटकाव घालण्यासाठी व नागरिकांच्या बचावासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अचानक लोकसंख्येच्या मोठ्या भागाला कोरोनाची लागण झाल्याने अपुऱ्या सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर निर्यातीवर बंदी घालून देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. यात आता अनेक खासगी कंपन्यांनीही पुढाकार घेत योगदान देऊ केले आहे.
1. कडक लॉकडाऊन जानेवारीच्या सुरुवातीला येथे कडक राष्ट्रीय लॉकडाऊन घोषित झालं. तेव्हा दर दिवशी 60 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद होत होती. मृत्यूंमध्ये 20% वाढ झाली होती.
2. पहिल्या डोसमध्ये उशीर वेगाने लसीकरण करण्यासाठी सरकारने दुसऱ्या डोसचा कालावधी एका महिन्यावरून तीन महिने केला. यामुळे लसींच्या कमतरतेचा प्रश्न सुटला. वेगाने पहिला डोस दिल्याने लोकांमध्ये अस्थायी रूपात का होईना संक्रमणाविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित झाली. येथे दर 100 नागरिकांवर 63.02 टक्के लोकांना डोस मिळाला. यामुळे मृत्युमध्ये 95 टक्के घट झाली.
3. रुग्णालयांत कडक नियम रुग्णालयांमध्ये फक्त अतिगंभीर रुग्णांसाठीच बेड राखण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही व्यक्तीला वशिलेबाजीमुळे बेड वा व्हेंटिलेटर देण्याबाबत कडक निगराणी करण्यात आली. कारण जवळजवळ 99 टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेली असतात, यामुळे वैद्यकीय सुविधा अतिगंभीर रुग्णांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत, हे तत्त्व त्यांनी पाळले.
4. कोविड प्रोटोकॉलचे पालन सरकारने येथे कोविड प्रोटोकॉलचे सक्तीने पालन करण्यासाठी मास्क न लावण्यास जबरदस्त दंड ठोठावयाला सुरुवात केली. खुल्या जागांवर सहापेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी घातली. यात लहान मुलांचाही समावेश होता. बार-रेस्तराँ पूर्णपणे टेक अवे करण्यात आले. यासोबतच एकदा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर दुसऱ्या रिपोर्ट करणाऱ्यांसही पायबंद घातला, जेणेकरून किटचे नुकसान होणार नाही.
5. टेस्टिंग वाढवल्या कोरोना संसर्गाचे नवे व्हेरिएंट आढळल्यावर काँटॅक्ट ट्रेसिंग, कोरोनाची तपासणी आणि जिनोम सीक्वेन्सिंगच्या कामात वेग आणला, जेणेकरून त्यावर वेगानेच नियंत्रण मिळवता येऊ शकेल.
भारतातही कोरोनाशी लढण्यासाठी जवळपास अशीच रणनीती आखण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा सामूहिक प्रयत्नांनीच जिंकता येणार आहे. लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राने आता राज्यांना तसेच खासगी क्षेत्रांनाही लस खरेदीची मुभा दिली आहे. ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून देशभरात प्रत्येक जिल्ह्यात मिळून तब्बल 551 नवे प्लांट्स उभारले जाणार आहेत. याशिवाय खासगी क्षेत्रानेही आपले पोलाद उत्पादन थांबवून ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सकारात्मक मानसिकताही गरजेची आहे, सरकारच्या निर्णयांचे, नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे यावरून स्पष्ट होते.
Marathi Director Kedar Shinde said- India Must Have Britishers Today; Read Comparison Of india and UK Corona pandemic situation
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App