विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती आता २ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना या दिवशी वेळ दिल्याने आता राष्ट्रपतींच्या समोर याप्रश्नी चर्चा होणार आहे. Maratha reservation issue, Sambhaji Raje to meet President on September 2, invitation to one MP from each party in Maharashtra
महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या एका खासदारांनाही संभाजीराजे यांच्यासमवेत राष्ट्रपतींना भेटण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व पक्षीय गटनेते आणि अध्यक्षांना याबाबत पत्रे देण्यात आली आहेत.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या सर्व सवलती मिळाव्यात, सारथी संस्थेला भरीव निधी द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्यावतीने तरुणांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासह अनेक मागण्यांसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
कोल्हापूर येथे आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर सरकारने मागण्यांच्या पूर्ततेसाठी महिन्याची मुदत मागितली होती. ती मुदत संपल्यानंतरही मागण्याबाबत निर्णय न घेतल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले. नांदेड येथे झालेल्या मूक आंदोलनात मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झाले होते.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर गुन्हा का? असा सवाल त्यांनी केला होता. मराठा आरक्षणाची लढाई रस्त्यावर लढतानाच दिल्लीमध्येही लढण्याची तयारी संभाजीराजे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींची भेट महत्वाची मानली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App