राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन संपले आहे. 5 आणि 6 जुलै रोजी अधिवेशन पार पडले. या दोन दिवसांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर घेतला. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. तसेच अधिवेशनात मांडलेली विधेयके, अधिवेशनात झालेलं कामकाज यावर संवाद साधला. Mansoon Session 2021 CM Uddhav Thackeray Criticizes BJP in Press Conference After Assembly Session
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन संपले आहे. 5 आणि 6 जुलै रोजी अधिवेशन पार पडले. या दोन दिवसांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर घेतला. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. तसेच अधिवेशनात मांडलेली विधेयके, अधिवेशनात झालेलं कामकाज यावर संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काल जे घडलं ते अतिशय लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही. ही आपली परंपरा नाही, असे ठाकरे म्हणाले. विधिमंडाळातील कामकाजाचा दर्जा खालावण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न आहे हे पाहिले पाहिजे. लोकप्रतिनिधींकडे जनतेची अपेक्षा असते. माझ्या आयुष्यात काही बदल घडला पाहिजे असे जनतेला वाटते. तसेच हा बदल जिथे घडतो त्या ठिकाणी लोकप्रनिधींना जनता पाठवते. मात्र, काल जे काही दृश्य पाहायला मिळालं ते शरमेने मान खाली जावी असं कृत्य होतं. हे एका जबाबदार पक्षाने केलं. वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा. हे करायचे असेल तर रस्त्यावर करू शकता. मात्र, सभागृहामध्ये माइक असतात. माइक ओढायचे हे काही आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही. भास्करराव यांच्या दालनात जे काही घडलं त्यातील बरचसं वर्तन त्यांनी केलं. ते ऐकल्यानंतर शिसारी यावं असं हे वर्तन आहे. हा देशात तसेच राज्यात पायंडा पडायला नकोय. त्यासाठी प्रत्येकाने आपली मर्यादा काय आहे, हे समजून घ्यायला हवे.
पत्रकार परिषद – LIVE https://t.co/T6WcG6KFus — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2021
पत्रकार परिषद – LIVE https://t.co/T6WcG6KFus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2021
ठाकरे म्हणाले की, दोन दिवसांच्या अधिवेशनाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तुम्ही ऐकला. या दोन दिवसांमध्ये आम्ही जनतेला आनंदी तसेच समाधान देऊ असं काम केलं आहे. यावेळी सर्व विधानसभेत, विधान परिषदेत जे सदस्य उपस्थित होते, त्यांना धन्यवाद देतो. तसेच ज्या व्यक्तींकडून जे घडू नये ते घडले, ते सुधारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतील बोगस लसीकरणावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, बोगस लसीकरण ज्यांनी केलं त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. तसेच ज्यांना बोगस लस दिली त्यांचं रीतसर लसीकरण केलं जाईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Mansoon Session 2021 CM Uddhav Thackeray Criticizes BJP in Press Conference After Assembly Session
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App