MALIK VS WANKHEDE : ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ ; मलिक दुबईतून पुन्हा लागले कामाला ;पहा हा ‘फोटोबॉम्ब’

  • मध्यंतरी नवाब मलिक शांत झाले असे वाटत असतानाच ते परत एकदा कामाला लागले आहेत.
  • त्यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक सातत्याने करत आहेत. त्यासंदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले .यावर बराच गदारोळ झाला मात्र आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मौलवी सोबत दिसत आहेत. आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ‘फोटोबॉम्ब’ फोडला आहे.MALIK VS WANKHEDE: ‘What did you do, Sameer Dawood Wankhede?’; Malik returns to work from Dubai; see this ‘photobomb’

काय आहे फोटोत ?

निकाह करारनाम्यावर सही करताना समीर वानखेडे दिसत आहेत. मलिक यांनी ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देत फोटो पोस्ट केला आहे. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी वारंवार केला आहे.

 

त्यांनी वानखेडे यांचा ट्वटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.

मलिकांना लेकीची साथ

दरम्यान मलिक यांची लेक निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील काल वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती.

MALIK VS WANKHEDE: ‘What did you do, Sameer Dawood Wankhede?’; Malik returns to work from Dubai; see this ‘photobomb’

महत्त्वाच्या बातम्या