प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सातत्याने टार्गेट करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज चपखलपणे “चाणाक्षां”ची चूक पकडली… पडळकरांनी ही चूक दाखवताच पवारांनी ती सुधारलेली दिसली!! Malharrao or Yashwantrao Holkar Gopichand Padalkar caught the mistake of Chanaksha
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे सरदार सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवारांनी त्यांना अभिवादन केले. पण या ट्विटमध्ये पवारांनी मल्हारराव होळकर यांच्या ऐवजी यशवंतराव होळकर यांचा फोटो शेअर केला होता. गोपीचंद पडळकर यांच्या हे लक्षात येताच त्यांनी पवारांवर शरसंधान साधणारे ट्विट केले. पडळकरांनी चूक दाखवून दिल्यानंतर, पवारांनी ते ट्विट काही वेळातच डिलीट केले.
ज्यांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार? अशा लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये.तुम्ही कितीही थापा मारल्या तरी आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जय मल्हार. pic.twitter.com/b1bbrFaPai — Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) May 20, 2022
ज्यांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार? अशा लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये.तुम्ही कितीही थापा मारल्या तरी आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जय मल्हार. pic.twitter.com/b1bbrFaPai
— Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) May 20, 2022
स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आणि ते वाढविण्यासाठी मल्हारराव होळकर यांनी आपले आयुष्य समर्पित केले. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. इंदौर संस्थानाचे संस्थापक, शूरवीर सेनानी राजे मल्हाराव होळकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/IPtxtD1RMy — Sharad Pawar (@PawarSpeaks) May 20, 2022
स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आणि ते वाढविण्यासाठी मल्हारराव होळकर यांनी आपले आयुष्य समर्पित केले. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. इंदौर संस्थानाचे संस्थापक, शूरवीर सेनानी राजे मल्हाराव होळकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/IPtxtD1RMy
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 20, 2022
– पडळकरांचे ट्विट
ज्यांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार? अशा लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये. तुम्ही कितीही थापा मारल्या तरी आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जय मल्हार, असे ट्विट करत पडळकर यांनी पवारांवर शरसंधान साधले. पण त्यानंतर पवार यांनी आपले आधीचे ट्विट डिलीट करून नवीन ट्विटमध्ये मल्हारराव होळकर यांचा फोटो वापरला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App