विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला आज नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला. प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, आमच्या पक्षातून कोणीही कुठेही जाण्याचा प्रयत्न करत नाही. आमची बोट ही एक सेफ बोट आहे तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांची बोट ही टायटॅनिक बोट आहे, जी कधीही बुडू शकते. हे तिन्ही पक्ष प्रत्येक जण आपापल्या बाजूनं खेचत राहतात अशी ही बोट आहे.
Mahavikas Aghadi is like Titanic boat : Narayan Rane
Narayan Rane : उद्घटनापूर्वीच राणेंचा धमाका!चिपीचं श्रेय आमचंच;चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन आता राजकारण पेटणार?
आज बाबरी मशीद बलिदान दिवस असल्याचे ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केले होते. याबद्दल जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यामध्ये चुकीचे काहीही नाहीये. त्यांच्या शेजारी उभे असलेले नारायण राणे यांनी लगेचच म्हटले, नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख आहेत का? असे म्हणत ते पुढे काहीही न बोलता निघून गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App