विशेष प्रतिनिधी
मुंबई : आधी आमदारांच्या निधीत 1 कोटींची वाढ नंतर त्यांना मोफत घरांची खिरापत…!! या मुद्द्यावर सर्वसामान्य जनता संतापली असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील मोफत घर घेण्याचे नाकारले आहे. आमदारांना मोफत घरे देण्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट वीज मोफत द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. Mahavikas Aghadi government reverses free housing scheme for MLAs; The people are angry !!
मात्र एकूणच आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयावरून सोशल मीडियात जनतेचा संताप उसळला दिसत असून अनेकांनी आमदारांचा पगार किती?, त्यांचा पीएसआय पगार किती? त्यांना गाडी – प्रवास मोफत. बाकीचे भरमसाठ भत्ते यांचा हिशेब काढला तर दरमहा 5 लाख रुपये खर्च येतो, असे म्हटले आहे. एवढा खर्च आमदार सारख्या लोकप्रतिनिधीत्व लोकप्रतिनिधी करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला रेशन, पाणी शिक्षण, वीज यावर खर्च करा, अशा सूचना अनेकांनी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावर केल्या आहेत.
आमदारांना पगार 2 लाख 10000 रुपये दिला जातो. याखेरीज त्यांच्या पीएना 30000 रुपये पगार, संगणक चालकांना 10000 रुपये पगार, मोबाईल बिल 8000 रुपये गाडीसाठी 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज तेवढ्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यात आता म्हाडा आमदारांना मुंबईत मोफत घर देणार आहे. ही घोषणा राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीला दुजोरा दिला.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून जनतेचा संताप व्यक्त होताना दिसत आहे. कोरोना काळात ज्यांच्या घरात माणसे मेली त्यांना सरकारची मदत अजून पोहोचली नाही नुसतीच घोषणा झाली. वैद्यकीय सुविधांचा महापालिकांपासून ते थेट नगरपालिकांपर्यंतच्या रुग्णालयांमध्ये अभाव आहे. त्याच्यावर खर्च करायला निधी कमी पडतो आहे. अशा स्थितीत आमदारांवर मोफत घरांची खैरात कशासाठी?, असा सवाल अनेक जण विचारताना दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App