महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर; पेट्रोल – डिझेल स्वस्त करा; अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे निवेदन


प्रतिनिधी

मुंबई : गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे ५ रूपये तर डिझेलमागे १० रूपये कमी केल्याने सामान्य नागरिकांनी सुटकेसा निःश्वास टाकला आहे. वाढत्या महागाईत इंधनदर कमी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.Mahavikas Aghadi government has a home base; Petrol – make diesel cheaper; Statement of All India Motor Transport Congress

केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या आणि डिझेलवरच्या अबकारी करामध्ये घट केल्याने इंधनाच्या कमी झाल्या आहेत. मात्र आता राज्यानेही आपल्या व्हॅट करात कपात करावी, असेही आवाहन केंद्राने केले आहे. अशातच आता राज्याने व्हँट कमी करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने करत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.वाहतूक संघटनाही आक्रमक

केंद्राने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने राज्यातील कर कमी करावे अशी मागणी सर्वच विरोधी पक्षनेते करत आहेत, आता या मागणीसाठी वाहतूक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसच्याच संघटनेने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्याने हा विषय विरोधी पक्षांसाठी चर्चेचा बनला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने निवेदन दिले आहे. तसेच याप्रकरणी जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीला संघटनेच्या चेअरमनने प्रतिक्रियाही दिली आहे. यामध्ये त्यांनी केंद्राने इंधन दर कमी केल्यानंतर इतर राज्यांनी कमी केलेले दर सांगितले आहेत. उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या भाजप शासित राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना आता तुलनेने स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे.

भाजपाचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारकडे राज्याने व्हँट कमी करून जनतेला दिलासा द्यावी, अशी मागणी केल्यानंतर यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. वसूली आणि टक्केवारी या दोन शब्दांत मुख्यमंत्र्यांचे कान उघडण्याची क्षमता आहे. बाकी त्यांना काहीच ऐकू येत नाही, अशी टीका भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Mahavikas Aghadi government has a home base; Petrol – make diesel cheaper; Statement of All India Motor Transport Congress

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण