नाना पटोले यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत भाजप आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.Maharashtra’s politics is moving towards crime- Nana Patole
विशेष प्रतिनिधी
मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांवर आरोप करत राजकारणात गोंधळ उडवला आहे. काल गोंदिया येथे काँग्रेस मेळावा पार पडला. यावेळी नाना पटोले यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत भाजप आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान यावेळी , ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनावट नोटांसाठी ज्या माणसाला इथं आणलं त्याचा अर्थ दोघांनीही राष्ट्रद्रोह केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा’, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.पुढे पटोले म्हणाले की ‘ईडी आमच्यावर लावतात म्हणून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी आमचेच मित्र पक्ष याची सुपारी घेत असल्याचे आपण पाहतो. या पद्धतीच्या चौकशा करून प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे.
तसंच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर आरोप केले. अंडरवर्ल्डच्या कडून जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इरफान नावाच्या व्यक्तीला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी राज्यात आणले होते. यामुळे त्या दोघांनी राष्ट्रद्रोह केल्याचे होत आहे.
त्यामुळे काँग्रेसने सरकारला विनंती केली की या प्रकरणात चौकशी करून दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,असं पटोले यांनी सांगितलं.आरोप प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. महाराष्ट्राचे राजकारण गुन्हेगारीकडे जात आहे. हे आता कुठे तरी थांबले पाहिजे, असंही पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App