विशेष प्रतिनिधी
मुंबई : सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई अव्वल ठरली आहे. मुंबईत आतापर्यंत ३५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हे राज्यातील सर्वाधिक लसीकरण शहर ठरले आहे. तर महाराष्ट्र देशातील सर्वाधिक लसीकरण करणारे राज्य ठरले आहे.Maharashtra tops in vaccination drive
कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच देशात सर्वाधिक लसीकरण करण्याबाबत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.
राज्यात आतापर्यंत २,३०,९९,०२० लसीकरण झाले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश १,९०,३४,६५६ , गुजरात १,७४,७१,७४२, राजस्थान १,७२,३१,१८६ येथे लसीकरण झाले आहे.
मुंबईसह राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत ३५,०३,७३३ लाभार्थींचे लसीकरण झाले. त्याखालोखाल पुणे २९,३७,६३०, कोल्हापूर ११,९०,०८३, नागपूर १२,९७,०७९, नाशिक १०,०८,५०९ लसीकरण झाले आहे.
मे महिन्यामध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लशींपैकी राज्यांनी आपल्या २५ टक्के साठ्यापेक्षा जास्त डोसची खरेदी केली आहे. मे महिन्यामध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लशींच्या ७.२९ कोटी डोसपैकी केंद्राने ४.०३ कोटी, राज्यांनी २.६६ कोटी तसेच रुग्णालये, वैद्यकीय संस्थांनी १.२४ कोटी डोस खरेदी केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App