महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट, लसीकरणासाठी तत्काळ सव्वा दोन कोटी डोस देण्याची टोपेंची केंद्राकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सरकार चिंतेत पडले आहे. त्या पार्श्वाभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. Govt. demanded two cr vaccine doses

प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली.दिल्ली दौऱ्यात आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. टोपे म्हणाले, की राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात व यशस्वीरीत्या राबवण्यात येत आहे. १.७७ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून सर्वांना पहिला डोस मेपर्यंत आणि दुसरा डोस जूनपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे

त्यासाठी कोव्हिशिल्ड व कोवॅक्सिणनच्या २.२० कोटी लशींची आवश्याकता आहे. त्या अनुषंगाने दर आठवड्यात २० लाख लशींचा पुरवठा करण्याची विनंती टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने ३६७ खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे उभारण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यापैकी २०९ रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे.

Govt. demanded two cr vaccine doses

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*