विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याचा जामीन अर्ज डोमिनिकाच्या न्यायालयात गुरुवारी फेटाळला. चोक्सीने अँटिग्वाहून डोमिनिकात अवैध प्रवेश केल्याबद्दल ही सुनावणी झाली.Court rejects bail plea of Mehul Choksi
त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले.न्यायदंडाधिकारी कँडिया कॅरेटी-जॉर्ज यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत चोक्सी हा पळून जाण्याची शक्यता व्यक्त करीत त्याला जामीन देऊ नये,
असा मुद्दा डोमिनिकन सरकारने मांडला. चोक्सीची डोमिनिकाशी कोणतीही बांधिलकी नसल्याने जामीन दिल्यानंतर त्याला देशातून पळून जाण्यापासून रोखता येणार नाही, अशी बाजू सरकारी वकील शेरमा डार्लिम्पल यांनी मांडली.
डोमिनिका चायना फ्रेंडशिप रुग्णालयात उपचार घेत असलेला चोक्सी (वय ६२) व्हिलचेअरवरुन न्यायालयात हजर झाला. डोमिनिकात अवैध प्रवेशाबद्दल दोषी नसल्याचे सांगत माझे अपहरण झाले होते
व जबरदस्तीने मला डॉमिनिकात आणले, असा दावा त्याने न्यायालयात केला.बचाव पक्षाचे वकील वेन नोर्डे म्हणाले की, चोक्सीची सध्याची प्रकृती पाहता तो पळून जाणाच्या स्थितीत नाही.
शिवाय अँटिग्वा आणि बार्बुडा येथे त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रलंबित असल्याने तो डोमिनिका सोडू शकत नाही असेही वकील म्हणाले. याप्रकरणाची सुनावणी येत्या १४ पर्यंत स्थगित ठेवण्यात आली
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App