c60 पथकाची कामगिरी माहिती आहे?; डोक्यावर तब्बल दीड कोटींची इनामे असणाऱ्या 14 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय!!


वृत्तसंस्था

नागपूर : गडचिरोलीच्या ग्यारापट्टीत नक्षलवाद्यांविरुद्ध जबरदस्त कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या c60 पथकाच्या कामगिरीच्या थराराविषयी पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी माहिती दिली आहेच.Maharashtra Police recovered a huge cache of arms and ammunition from the jungles of Gyarapatti in Gadchiroli

त्याच वेळी त्यांनी नेमके कोणते नक्षलवादी मारले गेले आहेत याची यादीच सादर केली आहे. त्यावरून महाराष्ट्र पोलिसांच्या c60 या पथकाने किती जबरदस्त कामगिरी केली आहे याची प्रचिती येते.

महाराष्ट्र पोलिसांनी केवळ नक्षलवाद्यांचा म्होरक्या आणि भीमा कोरेगाव दंगलीचा आरोपी मिलिंद तेलतुंबडे यालाच ठार मारले असे नाही, तर तब्बल 1 कोटी 46 लाख रुपयांची डोक्यावर इनामे असणाऱ्या 14 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. यापैकी एकट्या मिलिंद तेलतुंबडे यांच्या डोक्यावर 50 लाखांचे इनाम होते. बाकीचे 13 नक्षलवादी 8.00 लाखापासून 2.00 लाख रुपयांपर्यंतच्या इनामाचे होते.

नक्षलवाद्यांच्या कॅडर मधले हे सगळे महत्त्वाचे नक्षलवादी होते. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सर्व राज्यांमध्ये या नक्षलवाद्यांचा संचार होता. शहरी आणि जंगली भागात हे नक्षलवादी कार्यरत होते. या सगळ्यांची यादी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सादर केली आहे या नक्षलवाद्यांच्या डोक्यावरची इनामाची एकूण रक्कम एक कोटी 46 लाख रुपये एवढी आहे.

Maharashtra Police recovered a huge cache of arms and ammunition from the jungles of Gyarapatti in Gadchiroli

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात