Maharashtra assembly session : गेल्या वेळच्या अधिवेशनात मांजरीचे “म्याव गाजले… यावेळी “साप” डोलतोय…!!


नाशिक: महाराष्ट्राचे विधिमंडळ माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की प्राण्यांचे…??, हा प्रश्न गेल्या अधिवेशनापासून अधिक तीव्रतेने पडायला लागला आहे…!! महाराष्ट्राच्या युवराजांकडे पर्यावरण खाते आहे म्हणून नव्हे, तर महाराष्ट्र विधिमंडळाचे विविध सदस्य ज्या भाषेत बोलतात त्या भाषेमुळे हा प्रश्न पडायला लागला आहे…!!Maharashtra assembly session:In the last convention, the cat’s “meow roared” … this time the “snake” is swaying .

विधिमंडळाच्या अधिवेशनात सभागृह पेक्षा बाहेरच्या मुद्द्यांवर सभागृहात गदारोळ आणि गोंधळ होताना दिसतोय. गेल्या वेळच्या अधिवेशनात मांजरीचे “म्याव” गाजले. या वेळच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून “साप” डोलायला लागला आहे…!!गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे बघून मांजरीचा आवाज “म्याव” काढला. त्यावर सगळे सदस्य हसले. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर नवाब मलिक यांनी तो मुद्दा आपल्या ट्विटर हँडल वर उचलून कोंबड्याचे चित्र टाकत “पहचान कौन?” अशी टॅगलाईन दिली. त्यावर महाराष्ट्र विधिमंडळ आणि बाहेरही जोरदार राजकीय घमासान झाले. आता नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. नितेश राणे दिशा सालियन प्रकरणात मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरे जात आहेत.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू झाले आहे. या अधिवेशनात “साप” डोलायला लागला आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर जोरदार भाषण करून गेली 30 वर्षे आम्ही “सापाच्या पिल्लाला” दूध पाजले. तो “साप” आता वळवळायला लागला, अशी जहरी टीका भाजप वर केली. त्या “सापा”च्या मुद्द्यावरून आज भाजपने मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. तुम्ही आम्हाला “साप” म्हणून घेताय. ठीक आहे. पण संपूर्ण देशाच्या विरोधात फणा काढून बसलेला नाग तुम्ही मंत्रिमंडळ ठेवलाय. मुख्यमंत्री महोदय, तो तुम्हालाच डंख मारल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

गेल्या वेळेस मांजरीचे “म्याव” महाराष्ट्र विधिमंडळात आणि बाहेरही बरेच दिवस गाजले. यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डोलायला लागलेला “साप” आणखी किती दिवस डोलतोय ते बघायचे…!!

Maharashtra assembly session:In the last convention, the cat’s “meow roared” … this time the “snake” is swaying .

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी