मैत्रीच्या आमिषाने हनी ट्रॅपचा फास, पैसे उकळण्याचे वाढले प्रकार


सोशल मीडियावर मैत्रीच्या आमिषाने हनी ट्रॅपच्या फासात अडकविण्याचे प्रकार वाढत आहेत. पुणे शहरातील ६८२ जणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुकीत सायबर चोरटय़ांचे सावज ठरणारे तक्रारदार उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे.The lure of friendship, the trap of the honey trap, the increased form of boiling money


विशेष प्रतिनिधी

पुणे : सोशल मीडियावर मैत्रीच्या आमिषाने हनी ट्रॅपच्या फासात अडकविण्याचे प्रकार वाढत आहेत. पुणे शहरातील ६८२ जणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुकीत सायबर चोरटय़ांचे सावज ठरणारे तक्रारदार उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी मैत्रीच्या मोहजालात (हनी ट्रॅप) अडकवून शहरातील ६८२ जणांना गंडा घालण्यात आला. यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिना अखेरीपर्यंत अशा पद्धतीने १८९ जणांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

समाजमाध्यमावर अनोळखी व्यक्ती किंवा महिलेने मैत्रीची विनंती पाठविल्यास खातरजमा करणे गरजेचे आहे. सायबर चोरटे मैत्रीच्या मोहजालात किंवा आमिषाने पैसे उकळतात. बदनामीच्या भीतीमुळे अनेक जण तक्रारी देण्याचे टाळतात. मध्यंतरी उच्चभ्र महिलांशी मैत्रीच्या आमिषाने शहरातील एका व्यावसायिकाला ६० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. फ्रेंडशिप क्लब तसेच समाजमाध्यमावर महिलांशी मैत्रीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

The lure of friendship, the trap of the honey trap, the increased form of boiling money

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात