प्रतिनिधी
मुंबई : चित्रपट प्रदर्शनापूर्वी अनेक अभिनेते-अभिनेत्री सिद्धिविनायक येथे जाऊन बाप्पाचे आवर्जून दर्शन घेतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. पुत्र अभिषेक बच्चनही त्यांच्या सोबत होते. अमिताभ बच्चन व अभिषेक यांनी सिद्धीविनायकाची मनोभावे पूजा केली.”Swarm” on display tomorrow; Today Mahanayak Siddhivinayak Charani … !
यावेळी सिद्धिविनायक मंदिर देवस्थानचे विश्वस्त व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राजाराम देशमुख यांनी अमिताभ बच्चन यांना बाप्पाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कारही केला.
झुंड चित्रपट प्रदर्शित होणार
अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपट उद्या ४ तारखेला प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटाबद्दल चित्रपटरसिकांच्या व अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. झुंड चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन बाप्पाची मनोभावे प्रार्थना करून बाप्पाचे आशिर्वाद घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App