LOCKDOWN : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आज सकाळी नऊ वाजता निर्णय…


आज सकाळी 9 वाजता ही महत्वाची बैठक होणार आहे.LOCKDOWN: Lockdown again in Maharashtra? Decision in the presence of the Chief Minister this morning at 9 o’clock 


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड विस्फोट होतोय .विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ झालेली त्यामुळे राज्यात किंवा मुंबई-पुणे या ठराविक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू शकते का?

याच प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल पुण्यात महत्त्वाचं विधान केलं आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोनाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली.



“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्या सकाळी नऊ वाजता अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. जे निर्णय इथे घेण्यासारखे होते ते मी जाहीर करतोय.

जे निर्णय राज्य सरकारने मुंबईत बसून घेतले पाहिजे त्यासाठी उद्या सकाळी नऊ वाजता बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही त्याबाबत ठरवू. नंतर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ, मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतली. त्यानंतर तो निर्णय सगळीकडे जाहीर करु”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात उद्यापासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसलं तर त्या व्यक्तीकडून थेट 100 रुपयांचा दंड घेतला जाईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं.

LOCKDOWN: Lockdown again in Maharashtra? Decision in the presence of the Chief Minister this morning at 9 o’clock

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात