liquor sell During Weekend Lockdown : राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. दररोज विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यामुळेच राज्य सरकारने सध्या वीकेंड लॉकडाऊन लादलेले आहे. याकाळात अनेक व्यवसायांवर निर्बंध असले तरी प्रशासन मुंबईत मद्यप्रेमींवर मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान मुंबईत मद्यविक्रीला सूट देण्यात आलेली आहे. असे असले तरी थेट वाईन शॉपवर विक्री होणार नसून होम डिलिव्हरीची अट त्यात घालण्यात आली आहे. liquor sell During Weekend Lockdown In Mumbai On condition Of home delivery
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. दररोज विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यामुळेच राज्य सरकारने सध्या वीकेंड लॉकडाऊन लादलेले आहे. याकाळात अनेक व्यवसायांवर निर्बंध असले तरी प्रशासन मुंबईत मद्यप्रेमींवर मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान मुंबईत मद्यविक्रीला सूट देण्यात आलेली आहे. असे असले तरी थेट वाईन शॉपवर विक्री होणार नसून होम डिलिव्हरीची अट त्यात घालण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दारू विक्रीसाठी परवानाधारक मद्य दुकानांना सूट दिली आहे. बीएमसीने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सकाळी 7 ते रात्री 8 यादरम्यान होम डिलिव्हरी सेवेद्वारे दारू विकली जाऊ शकते. पण वितरण अधिकाऱ्यांना कोविड -19चे प्रोटोकॉल पाळावे लागतील. याशिवाय मद्यप्रेमींकडे दारू पिण्याचा परवाना असणेही गरजेचे आहे. बीएमसी आयुक्त आयएस चहल म्हणाले की, डिलिव्हरीसाठी फेस मास्क घालणे आणि नियमित हात स्वच्छ करणे सक्तीचे असेल.
बीएमसीने रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सला फूड डिलिव्हरीसाठीही परवानगी दिली आहे. कोणीही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये कॉल करू शकतो आणि भोजन मागवू शकतो. यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकात स्विगी, झोमाटो आणि ग्रोफर्ससारख्या काही ऑनलाइन सेवांना परवानगी होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवार व रविवार लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. बाजारपेठेत आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या भागांवर अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेऊन असे संकेत दिले आहेत. याबाबत रविवारी टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे स्वत: करण्याची शक्यता आहे. पुढील लॉकडाऊन हा 8 ते 14 दिवसांचा असू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.
liquor sell During Weekend Lockdown In Mumbai On condition Of home delivery
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App