विधान परिषद : भाजपचे 2 आजारी आमदारही मुंबईत; शिवसेना आमदारांच्या नाराजीची चर्चा; राष्ट्रवादीचे 3 आमदार मुंबईबाहेर


प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मतदान सुरू झाले असताना महाविकास आघाडी, भाजपमध्ये वेगवेगळ्या हालचालींची चर्चा सुरू झाली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोन भाजपचे आमदार गंभीर आजारी असूनही मतदाराचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत, तर ऐन मतदानाच्या वेळी शिवसेनेचे आमदार काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे हे आमदार मुंबई पोहोचलेच नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे.Legislative Council: 2 sick BJP MLAs also in Mumbai; Discussion of Shiv Sena MLAs’ displeasure; 3 NCP MLAs out of Mumbai

जगताप, टिळक मतदान करणार

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोन्ही आमदार गंभीर आजारी आहेत. परंतु, राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पुण्याहून मुंबई पर्यंत प्रवास करत मतदानाचे कर्तव्य पार पाडले होते. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी राज्यसभा निवडणुकीतला विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन्ही आमदारांना समर्पित केला होता. विधानपरिषद निवडणुकीत देखील हे दोन्ही आमदार मतदान करणार आहेत.



– शिवसेना आमदारांची नाराजी कायम

विधान परिषद निवडणुकीचे मतदान सुरू होऊन भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी पहिले मतदान केले आहे. मतदानाचा सिलसिला सुरू झाला आहे. मतदान सुरू झाल्यानंतर देखील शिवसेना आमदारांच्या नाराजीची चर्चा थांबलेली नाही शिवसेनेचे आमदार निधी वाटप या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेतच परंतु आपल्या पक्षनेतृत्वावर आणि काँग्रेसवर देखील त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही.

सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत असताना राष्ट्रवादीच्या 3 आमदारांनी पुन्हा धाकधूक वाढवली आहे. मतदानाची वेळ जवळ आली तरी राष्ट्रवादीचे 3 आमदार अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत.

– मोहिते, काळे, बनसोडे कुठे आहेत?

या तीन आमदारांमध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हे तीन आमदार मुंबईत मतदानासाठी अद्याप दाखल झाले नसले तरी पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. मतदानाचा कालावधी संपण्यापूर्वी हे तीनही आमदार मुंबईत दाखल होतील. अण्णा बनसोडे हे प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईत पोहोचले नाहीत, तर आशुतोष काळे हे स्थानिक निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे ते पोहोचू शकले नाही. परंतु दिलीप मोहिते पाटील यांच्या बद्दल अजूनही कोणतीही अपडेट नसल्याचे समोर आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्यावेळी हे आमदार वेळेवर पोहोचले नव्हते त्यामुळे आजतरी ते वेळेवर पोहोचणार का?, याकडे विरोधकांचे लक्ष लागून आहे.

Legislative Council: 2 sick BJP MLAs also in Mumbai; Discussion of Shiv Sena MLAs’ displeasure; 3 NCP MLAs out of Mumbai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात