अग्निपथ योजना : अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवेनंतर आनंद महिंद्रा यांची देखील भरतीची संधी!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ भरती योजनेतील अग्निवीरांना 4 वर्षांच्या सैनिकी सेवेनंतर नोकरीची संधी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील उपलब्ध करून दिली आहे. अग्नी वीरांना सैन्यदलामध्ये जे प्रशिक्षण आणि कौशल्य विकसन संधी मिळेल त्याचा उपयोग ते देशासाठी करतीलच. परंतु त्यानंतर महिंद्रा उद्योग समूह देखील त्यांच्या भरतीचे स्वागत केले जाईल, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.Agneepath Yojana: Anand Mahindra also gets recruitment opportunity after 4 years of service to Agniveer !!

त्याच वेळी देशात अग्निपथ योजने विरुद्ध दिवसाच्या हिंसाचार माजवला जातो आहे त्याबद्दल देखील आनंद महिंद्रा यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हिंसेतू मिळत नाही. युवकांनी हिंसेचा मार्ग सोडावा, असे आवाहन आनंद महिंद्र यांनी केले आहे.



-75 टक्‍क्‍यांपर्यंत विविध सेवांमध्ये संधी

अग्निपथ योजनेतून भरती झालेल्या अग्निवीरांना 4 वर्षानंतर केंद्र सरकारच्या निमलष्करी दलात तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम आदी राज्यांमध्ये पोलिस दलात भरतीमध्ये प्राधान्य देण्याची घोषणा आधीच संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अग्निवीरांना आत्तापर्यंत सुमारे 50 % राखीव जागा यातून उपलब्ध होणार आहेत. 25% अग्निवीर सैन्यदलामध्ये कायमचे समाविष्ट होणारच आहेत. याखेरीज आता प्रत्यक्ष सरकारी सेवेत सुमारे 50 % कायम सेवेची संधी आणि महिंद्रा उद्योग समूह सारख्या खासगी उद्योग समूहात नोकरीची संधी अशा मोठ्या संधी अग्निवीरांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

Agneepath Yojana: Anand Mahindra also gets recruitment opportunity after 4 years of service to Agniveer !!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात