शिवसेना – राहुल साम्य काय??; उतरत्या कळेचे वाढदिवस दुसरे काय??


शिवसेना – राहुल साम्य काय??, उतरत्या कळेचे वाढदिवस दुसरे काय?? असे म्हणायची खरंच आज 19 जून रोजी आली आहे. शिवसेना आणि राहुल गांधी या दोघांचे आज वाढदिवस आहेत आणि दोघांचेही वाढदिवस विशिष्ट राजकीय दबावात साजरे करावे लागत आहेत. Shiv Sena – What is Rahul similarity

शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन उद्या विधान परिषद निवडणुकीत काय घडणार?? कसे घडणार?? काही घडले तर पुढे काय घडणार?? या चिंतेमध्ये साजरा होतो आहे. उद्धव ठाकरे यांची नेहमीप्रमाणे भाजपवर तोफ धडाडली असली, तरी प्रत्यक्ष छातीतली धडधड उद्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वाढली आहे.

एरवी शिवसेनेचे वर्धापन दिन मोठ्या मैदानात शिवाजी पार्कवर किंवा षण्मुखानंद हॉलमध्ये साजरे झाले आहेत. परंतु शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन संबोधनात आणि शिवसेना आमदारांना कोंडलेल्या जवळच्या हॉटेलात साजरा होतो आहे. शिवसेनेच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात, त्यांच्या शैलीत काही कमी नाही. मुद्दा फक्त शिवसेनेचा वर्धापन दिन हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाटत नाही हाच आहे!! विधान परिषद निवडणुकीचे धास्तीचे प्रचंड मोठे सावट शिवसेनेच्या वर्धापन दिनावर आहे.

इकडे मुंबई शिवसेनेचे “असे”, तर दिल्लीत राहुल गांधींचे “तसे” राहुल गांधींचा आज 52 वाढदिवस आहे. पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या धरणे आंदोलनात ते जंतरमंतरवर सामील झाले आहेत. सध्या देशातला तरुण बेरोजगारीच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे आपला वाढदिवस कोणी साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी कालच केले आहे.

परंतु त्यापलिकडे जाऊन स्वतः राहुल गांधी नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये ईडीच्या अटकेच्या सावटाखाली छोटा वाढदिवस साजरा करत आहेत. राहुल गांधी यांचा वाढदिवस दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जंगी जाहीर सभा घेऊन झाला असता पण ते स्वतःच ईडीच्या चौकशी आणि तपासाच्या सावटाखाली आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधींवर सर गंगाराम हॉस्पिटल मध्ये उपचार डॉक्टरांच्या देखरेखीखाली!!, अशा स्थितीत वाढदिवस साजरा करायचा तरी कसा आणि का म?,, हाच मोठा प्रश्न आहे!!

काँग्रेसची संघटना एवढी दुबळी झाली आहे की फक्त राहुल गांधींच्या चौकशीच्या विरोधातच ती एकवटलेली दिसते. बाकीच्या कोणत्याही जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस त्या जोशात आणि जोमात रस्त्यावर उतरताना गेल्या कित्येक वर्षात दिसलीच नाही.

शिवसेना काय किंवा राहुल गांधी काय या दोघांचेही आजचे वर्धापन दिन असेच उतरत्या कळेच्या सावटा खालीच साजरे होताना दिसत आहेत. या वाढदिवसातून ना संघटनेचे चैतन्य उत्पन्न होते आहे, ना त्यांच्या राजकीय भवितव्य दडलेल्या संकटांना उत्तरे मिळत आहेत!! दोघांसाठी काळ मोठा कठीण आला आहे!! दोघांच्याही वाढदिवशी तसेच संकेत मिळत आहेत.

Shiv Sena – What is Rahul similarity

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात