राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करून देखील कर्मचारी त्यांच्या विलीनीकरण निर्णयावर ठाम आहेत. Latur: ST Corporation suspends 186 employees in the district
विशेष प्रतिनिधी
लातूर : लातूर जिल्ह्यात सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन अद्यापही सुरू आहे.लातूर जिल्ह्यातील आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १८६ झाली आहे.विलीनीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा निर्धार एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करून देखील कर्मचारी त्यांच्या विलीनीकरण निर्णयावर ठाम आहेत.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहे. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाऐवजी थेट बडतर्फच्या कारवायाचे संकेत दिले आहे.
दरम्यान काल ११६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यापूर्वी ७० कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १८६ झाली आहे. तुटेपर्यत ताणू नये, असे एसटी महामंडळ प्रशासनाचे मत आहे. इतर कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन एसटीचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी यावेळी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App